स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Thursday, 23 March 2017

Army, Police, BSF, CRPF, SRPF Recruitmentतरुणांसाठी सैन्य भरती - एक सुवर्णसंधी


बुधवार, २२ मार्च, २०१७


भारतीय सैन्य हे जगातील सर्वोत्कृष्ट सैन्य असून भारत मातेची सेवा करतांना प्रत्येक सैनिक गौरवान्वित होत असतो. प्रत्येकाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर तो स्वतःला भाग्यवान मानतो. आपल्या तरुणांना नेहमीच सैन्यात जाण्याचे आकर्षण असते. भरपूर मानसन्मान, उत्तम वेतन आदी सुविधा उपलब्ध असल्याने सैन्यातील नोकरीसाठी हजारो तरुण प्रयत्न करत असतात. या नोकरीत असलेली पारदर्शकता पाहता योग्य गुणवत्ता असणाऱ्या उमेदवाराला संधी मिळते. भारतीय सैन्यातील तिन्ही दलासाठी वेळोवेळी सैन्य भरती होत असते. वेळोवेळी विविध वर्तमानपत्रातून किवा सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासंबंधी जाहिरात दिली जाते. सध्या महाराष्ट्रात नऊ जिल्ह्यांसाठी सैन्य भरती मेळावा होणार आहे. या जिल्ह्यातून भरल्या जाणाऱ्या विविध पदाविषयी थोडक्यात माहिती आपण या लेखातून करून घेणार आहोत.

राज्यातील धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सैन्य भरती होणार आहे. सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर (टेक्नीकल), सोल्जर (क्लार्क स्टोअर कीपर) सोल्जर (ट्रेडसमन) या पदासाठी ही भरती होणार आहे.

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

सोल्जर (जनरल ड्युटी) यासाठी उमेदवार ४५ टक्के गुणासहित दहावी उत्तीर्ण असावा. सोल्जर (टेक्नीकल) या पदासाठी उमेदवार ५० टक्के गुणासहित बारावी (पी.सी.एम.) उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर सोल्जर (क्लार्क स्टोअर कीपर) या पदासाठी उमेदवार ५० टक्के गुणासहित बारावी उत्तीर्ण असावा. तसेच सोल्जर (ट्रेडसमन) - या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

या विविध पदांसाठी वयाची अट अशी आहे ती म्हणजे सोल्जर (जनरल ड्युटी) या पदासाठी उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते ३१ मार्च २००० दरम्यानचा असावा. तसेच उर्वरित पदासाठी उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ ते ३१ मार्च २००० दरम्यानचा असावा. संबधित भरती प्रक्रियेचा कालावधी २७ एप्रिल ते ७ मे २०१७ या दरम्यान राहील.

ही सैन्य भरती जिल्हा क्रीडा स्टेडीयम जालना / एसआरपीएफ मैदान धुळे या ठिकाणी होईल. तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०१७ ही आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Bravo/jia-maintain.htm या संकेतस्थळास भेट द्यावी.

मित्रहो योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आपले सैन्य भरतीचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते त्यासाठी कठोर परिश्रम आणि सर्वोत्तम तयारीची गरज आहे. शारीरिक पात्रतेसाठीच्या तयारी बरोबर इतर संदर्भ पुस्तकाचाही सखोल अभ्यास करावा. योग्य नियोजन, सकारात्मक विचार ठेवल्यास यश आपोआप साध्य होईल चला तर मग...लागताय ना तयारीला... जय हिंद !

No comments:

Post a Comment