स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Thursday, 23 March 2017

डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र


डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-१)


शुक्रवार, १७ माच, २०१७


जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला असून आपल्या दैनंदिन आयुष्याचा बहुतांशी भाग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापून टाकला आहे. २०२० पर्यंत संपूर्ण जग डिजिटल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हे होत असतानाच डिजिटल मार्केटिंगच्या पर्यायाने सोशल मीडियाच्या क्षेत्रातदेखील रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत आहेत.

डिजिटल मीडिया हे संपर्काचे एक प्रभावी आणि सक्षम माध्यम असून या माध्यमाला अधिक व्यापक आणि स्थापित करण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न सुरु आहेत. १९९० च्या दशकात माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीला देशात प्रारंभ झाला, नंतरच्या काळात डिजिटलाईझेशनसाठी झालेल्या व्यापक प्रयत्नांमुळे ‘डिजिटल इंडिया’ कडे आपली वाटचाल सुरु झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध विभाग डिजिटल होत आहेत. संगणकाच्या माऊसची एक क्लिक किंवा स्मार्टफोनवर बोटाचा एक स्पर्श डिजिटल दुनियेतील माहितीचा खजाना आपल्यासमोर खुला करीत आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

इंटरनेट, स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे केले जाणारे विपणन म्हणजे डिजिटल मार्केटिंग.. यालाच आपण ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा म्हणू शकतो. पारंपरिक आणि डिजिटल मार्केटिंग यांच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी या दोघांचा उद्देश तसा एकच असतो. आपले उत्पादन किंवा एखादा उद्योग व संस्था म्हणून आपले लाभार्थी अथवा जनतेला जो संदेश द्यायचा आहे त्याबद्दल ग्राहकांमध्ये किंवा जनतेमध्ये अधिकाधिक जागृती निर्माण करण्याचे काम या डिजिटल मार्केटिंगद्वारे केले जाते.

डिजिटल उपकरणे घराघरात पोहोचली आहेत. इंटरनेट ॲन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या एका आकडेवारीनुसार २०१८ पर्यंत डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात देशात १५ ते २० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आणि ॲप्स डेव्हलपमेंट, माहितीचे विश्लेषण आणि सोशल मीडिया मार्केटिंग आदी घटकांचा यात समावेश असेल. वाढत्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्राने युवकांना भुरळ घातली असून या क्षेत्रात रोजगाराच्या आणि करियरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

डिजिटल मार्केटिंगचे घटक -

 • वेब, सोशल मीडिया, मोबाईल
 • एसईएम-सर्च इंजिन मार्केटिंग (एसईओ आणि पे पर क्लिक ॲडव्हर्टायझिंग)

 • स्मार्टफोन्स

 • मोबाईल मार्केटस (गुगल प्ले, ॲपल स्टोर)

 • ईमेल मार्केटिंग

 • ऑनलाईन बॅनर ॲडव्हर्टायझिंग

गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हा इंटरनेट मार्केटिंगमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तरुण पिढीचा सोशल मीडियावरचा वाढलेला वावर आणि ते वापरत असलेल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्समुळे सोशल संवादाबरोबरच ऑनलाईन खरेदी-विक्री आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रस्थ वाढू लागले आहे. सोशल मीडियाद्वारे जनतेला एकत्रितपणे माहितीचे आदानप्रदान करणे सहज शक्य झाले आहे. फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, पिंटरेस्ट, इन्स्टाग्राम, टम्बलर, लिंकेडिन, स्टम्बलअपॉन आणि युट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे डिजिटल मीडिया प्रभावी बनला आहे.

देशातील इंटरनेट वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उद्योग, व्यावसायिक कंपन्या ऑनलाईन उपस्थिती वाढवू लागल्या आहेत. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन नित्य नवे प्रयोग सुरु आहेत. मोबाईलवर लघुसंदेश (SMS), सूचना, अलर्ट्स पाठविण्याबरोबरच ब्लॉग वर लिखाण, त्यासाठी संशोधन, डिझाईनिंग, वेब स्टॅटिस्टिक्स रिपोर्टिंग आदी पद्धती अवलंबल्या जात आहेत. हे सर्व करण्यासाठी कौशल्याधारित मनुष्यबळाची डिजिटल मीडिया क्षेत्रात नितांत आवश्यकता आहे.

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील संधी -

 • डिजिटल मार्केटिंग डायरेक्टर/मॅनेजर
 • वेब डेव्हलपर आणि वेब डिझाईनर

 • सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह ॲण्ड सोशल मीडिया मॅनेजर

 • सर्च इंजिन एक्झिक्युटिव्ह/सर्च इंजिन एक्सपर्ट

 • पीपीसी/एसईएम एक्सपर्ट

 • कन्टेन्ट मार्केटर

 • ग्राफिक डिझाईनर

 • ॲप डेव्हलपर

 • इनबाऊन्ड मार्केटिंग मॅनेजर

 • कनव्हर्जेन रेट ऑप्टिमाईजर

डिजिटल मार्केटिंग किंवा मीडियातील कामाचे स्वरुप, जबाबदारी, आवश्यक पात्रता, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आदींची माहिती आपण पाहूया पुढील भागात.

No comments:

Post a Comment