स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Thursday, 23 March 2017

In this vacation ...get ready MS - CIT

मित्रहो सुट्टीत व्हा संगणक साक्षर...


गुरुवार, २३ मार्च, २०१७आजचे युग हे संगणक युग म्हणून ओळखले जाते. संगणक ही काळाची गरज बनली आहे. घर, ऑफिस, कार्यालये, उद्योग, व्यवसाय, शिक्षण,संशोधन आदी सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. संगणक हा मानवाचा मित्रच ठरला आहे. नवनवे बदल संगणकात होत असताना वापरकर्त्यांची संख्याही वाढणे गरजेचे ठरते. भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. म्हणजे संगणकाची अपरिहार्यता सर्वच ठिकाणी आहे. म्हणूनच प्राथमिक स्तरावर संगणक हाताळता येणे आवश्यक ठरले आहे. संगणक साक्षरता येण्यासाठी आता शासन पातळीवरही मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. लवकरच दहावी बारावीच्या परीक्षा संपतील आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना विविध संगणक कोर्स पूर्ण करता येतील. त्याची माहिती पुढीलप्रमाणे –

माहिती तंत्रज्ञान साक्षरता येण्यासाठी एम.के.सी.एल ने २००२ साली एमएससीआयटी (MS-CIT) हा दोन महिन्याचा संगणक कोर्स सुरु केला आहे. या कोर्समध्ये संगणकाच्या मुलभूत गोष्टी बरोबर २१ व्या शतकातील जीवन, नागरिकत्व, अभ्यास आदी कौशल्ये विकसित होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. संगणक हाताळणीसाठी जास्तीत जास्त कालावधी उपलब्ध करून दिला जातो. इंटरनेटचा रोजच्या व्यवहारात कसा वापर करावा याविषयी माहिती दिली जाते. या कोर्सच्या प्रवेशासंबंधी माहितीसाठी http://ww3.mkcl.org/mscit/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

त्याचप्रमाणे राज्य तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नोकरीसाठी ‘ट्रिपल सी’ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचा कालावधी तीन महिन्याचा आहे. एमएससीआयटी किंवा ट्रिपल सी यापैकी एक अभ्यासक्रम पूर्ण करणे शासन सेवेत अनिवार्य आहे.

व्यावसायिक कौशल्यासाठी डीटीपी म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग हा तीन महिन्याचा कोर्स सुट्टीत करता येईल. डीटीपीमध्ये कॉम्प्युटराइज टायपिंग, फोटो एडिटिंग, ले-आउट डिझायनिंग, प्रि-प्रेस प्रोसेसिंग या गोष्टी अंतर्भूत आहेत. यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. डीटीपी कोर्स निवडताना काय काय शिकवले जाणार आहे, याची व्यवस्थित माहिती घ्यावी. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी व्यक्तींकडून शिकणे अधिक चांगले. प्रकाशन, जाहिरात, विधीविषयक क्षेत्रात डीटीपी चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. तसेच वाणिज्य शाखेची आवड असणारे टॅली हा कोर्स करू शकतात. लेखा (अकाऊंट) विषयक कामे संगणकीकृत झाली असल्याने या कोर्सला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लेखापालन अर्थात अकाउंटिंगच्या गरजा ध्यानात घेऊन टॅली हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

मित्रहो विस्तारत जाणाऱ्या संगणक युगात टिकून राहण्यासाठी त्याचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. आजकाल संगणक खरेदी करणेही आवाक्यात आले आहे. तर मग उन्हाळ्यातील या सुट्टीचा सदुपयोग करण्याचा निर्धार करा आणि आपल्या आवडीचा कोणताही एक संगणक कोर्स पूर्ण करा कारण ती काळाची गरज आहे.

No comments:

Post a Comment