स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Thursday, 23 March 2017

Important Links for job

संधी रोजगाराची खात्री नोकरीची


बुधवार, २२ मार्च, २०१७


उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी !

बृहन्मुबई महानगरपालिकेत वैद्यकीय कार्यकर्ता पदाच्या ७ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ॲक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयात वैद्यकीय कार्यकर्ता (७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०१७ आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कॅनरा बँकेत अधिकारी पदाच्या १०१ जागा

कॅनरा बँकेत विविध क्षेत्रातील विशेषज्ञ अधिकारी (८८ जागा) आणि अनुसूचित जमाती संवर्गातील अधिकारी (१३ जागा) अशा एकूण १०१ जागांसाठी विशेष भर्ती मोहिमे अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०१७ आहे. अधिक माहिती http://www.canarabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत संचार निगममध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या २५१० जागा

भारत संचालक निगम लि. मध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या २५१० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०१६ आहे. अधिक माहिती www.externalexam.bsnl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश पदाच्या ७५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या पदाच्या ७५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल २०१७ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (लघुलेखक) पदाच्या २१९ जागा

केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (लघुलेखक) पदाच्या २१९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०१७ आहे. अधिक माहिती www.crpf.nic.in तसेच www.crpfindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दि न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये सहाय्यक पदाच्या ९७६ जागा

दि न्यू इंडिया ॲश्यरन्स कंपनी लि.मध्ये सहाय्यक पदाच्या ९७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मार्च २०१७ आहे. अधिक माहिती http://www.newindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अभियंता आणि विश्लेषक पदाच्या १५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक अभियंता (१० जागा) आणि कनिष्ठ विश्लेषक (तांत्रिक) (५ जागा) अशा एकूण १५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०१७ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नेहरु सायन्स सेंटरमध्ये विविध पदाच्या दोन जागा

नेहरु सायन्स सेंटर, मुंबई मध्ये एज्युकेशन असिस्टन्ट ‘ए’ (१ जागा), टेक्निशियन ‘ए’ (१ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०१७ आहे. अधिक माहिती www.nehrusciencecenter.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

होमी भाभा सेंटरमध्ये वैज्ञानिक अधिकारी पदाची भरती

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये वैज्ञानिक अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि.४ मार्च) झाल्यापासून २१ दिवस आहे. अधिक माहिती http://www.hbcse.tifr.res.in/advt या संकेतस्थळावर तसेच दि. ४ मार्च २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्युजमध्ये उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दलात असिस्टन्ट कमाण्डन्ट पदाची भरती (१५ जागा)

महासंचालक सीमा सुरक्षा दलामध्ये असिस्टन्ट कमाण्डन्ट (कार्ये) (७ जागा), असिस्टन्ट कमाण्डन्ट (विद्युत) (८ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि. ४ मार्च) झाल्यापासून ३० दिवस तर अतिदुर्गम भागातील उमेदवारांकरिता ४५ दिवस आहे. अधिक माहिती आणि आवेदन अर्ज www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सिवील डिफेन्स सर्विसेसमध्ये विविध पदांच्या ४ जागा

सिवील डिफेन्स सर्विसेसमध्ये टिनस्मीथ (१ जागा), कारपेंटर (१ जागा), लेबर/इंडस्ट्रीअल मजदूर (२ जागा) अशा एकूण ४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २५ फेब्रुवारी – ३ मार्च २०१७ च्या अकांत उपलब्ध आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाची भर्ती

केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात कनिष्ठ तांत्रिक सहायक (मास एज्युकेशन ॲण्ड मीडिया) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवस आहे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजचा दि. २१ ते २७ जानेवारी २०१७ चा अंक पहावा.

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन

सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 

'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

No comments:

Post a Comment