स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Tuesday, 3 October 2017

MAHA DBT Process

MahaDBT पोर्टल विशेष
••••••••••••••••••••••••••••••••
नमस्कार मित्रांनो,
     आपणा सर्वांना माहीत आहे की यावर्षी पासून सर्व शिष्यवृत्तीचे फॉर्म (अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक सोडून) हे आपणास MahaDBT पोर्टल वर ऑनलाईन भरायचे आहेत.DBT म्हणजे Direct Benifit Transfer.
     त्यासाठी काही महत्वाच्या सूचना
> आपण भरणार असलेला शिष्यवृत्ती फॉर्म हा आधार आधारित असल्याने आधार कार्डवरील खालील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे अन्यथा आधार कार्डवरील माहिती त्वरित बदलून घ्यावी.👇
नाव जन्मतारीख पत्ता व लिंग :-
          मुलाचे फॉर्म भरत  असतांना आधार नुसार माहिती आटोमॅटिक येत असल्याने विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख पत्ता व लिंग हे अचूक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड वरील माहिती चुकीची असेल तर आधार कार्ड update करा. डव्वा येथे updation चे काम सुरू आहे त्याप्रमाणे आपल्या जवळच्या centre वर जाऊन आधार update करण्याविषयी पालकांना कळवावे..
मोबाईल क्रमांक :-
      आपल्या आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर हासुद्धा  लिंक केलेला असावा . मोबाईल क्रमांक आधार ला लिंक असेल तर भविष्यात केव्हाही स्वतः च आधार update करता येईल. आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर खालील पद्धत वापरता येईल.
 बोटांचे ठसे (बायोमेट्रिक नोंदणी ):-
             या मध्ये विद्यार्थ्यांचे registration करण्यासाठी  बायोमेट्रिक device चा वापर करून registration सुरू आहे. व शिष्यवृत्ती ची माहिती भरणे सुरू आहे. माझ्याकडे मंत्रा biometric device द्वारे रेजिस्ट्रेशन सुरू आहे.
             काही जणांनी मुलांचे आधार कार्ड हे मूल लहान असतांनाच काढलेले आहे त्यावेळी त्यांनी आई किंवा वडिलांचे बोटांचे ठसे नोंदविलेले आहे.
      त्यामुळे अशा मुलांचे बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करतांना मुलांचे बोटांचे ठसे जुळणार नाही.
      त्यासाठी मूल पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बोटांचे ठसे सुद्धा अपडेट करून घेणे गरजेचे आहे. एकंदरीत , विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील संपूर्ण डिटेल्स हे अचूक असणे गरजेचे आहे.
बँक खाते:-
       शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतःचे किंवा विद्यार्थी व पालक यांचे संयुक्त राष्ट्रीयीकृत बँक खाते असणे गरजेचे आहे.
        महत्वाची गोष्ट म्हणजे या बँक खात्यासोबत सुद्धा  आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
      आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर बँक खात्याला आधार लिंक करण्याविषयी पालकांना कळवावे. त्याशिवाय विद्यार्थ्याच्या खात्यात  शिष्यवृत्तीची रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार नाही. विद्यार्थ्याचा खाता आधार लिंक आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी play store वरून adhar status नावाचे application download करावे व त्यात आधार क्रमांक घालून खाते कोणत्या बँकेत लिंक आहे ते पाहून त्याच खात्याची xerox अपलोड करावी.

विविध शिष्यवृत्ती साठी लागणारे Documents

1)आदिवासी(ST) सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती

1)आधार कार्ड
2) Income certificate with Barcode
(SDO/तहसीलदार/नायब तसीलदार/Dy.collector)
3)Bank passbook (Nationalized Bank) with adhar link
4) Caste certificate with barcode
5) Marksheet(last year)
6) Bonafide certificate with candidates photo
7) जन्माचा दाखला किंवा रहिवासी  दाखला.
➖〰〰➖〰〰➖〰〰➖

2) सावित्रीबाई फुले    शिष्यवृत्ती
1)आधार कार्ड
2)Bank passbook (Nationalized Bank) with adhar link
3) Caste certificate with barcode
4) Marksheet(last year)
5) Bonafide certificate with candidates photo
6) जन्माचा दाखला किंवा रहिवासी दाखला
➖〰〰➖〰〰➖〰〰➖
3) गुणवत्ता शिष्यवृत्ती
1)आधार कार्ड
2) Marksheet
3) Bank ac(Nationalized Bank) with adhar link
4) caste certificate
➖〰〰➖〰〰➖
4) अपंग शिष्यवृत्ती फक्त ST वर्ग 8 ते 12
1)आधार कार्ड
2) Marksheet
3) bank ac(Nationalized Bank) with adhar link
4) अपंग प्रमाणपत्र
5) Caste certificate
➖〰〰➖〰〰➖
5) अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती
     
1) वडील / विद्यार्थी अधिवास (रहिवासी ) प्रमाणपत्र
2) मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3) अपंग असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
4) वडील / विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
5) वडील किंवा आईचे अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
6) 20 रु.च्या स्टॅम्पवर पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे पालकाचे स्वयं घोषणा पत्र
7) मागील वर्षाची गुणपत्रिका
          अस्वच्छ शिष्यवृत्तीचा फॉर्म हा कोणत्याही जातीचा विद्यार्थी भरू शकतो फक्त त्याचे पालक अस्वच्छ व्यवसाय करणारे असावे.
        वरील सर्व डाकूमेंटस ही jpeg या फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावी लागतात . स्कॅन केलेल्या डाकूमेंटस ची फाईल साईज ही 256 kb पेक्षा कमी असावी.
आणखी काही माहिती भरावी लागते ती अशी
👨🏻‍⚕वडिलाचे नाव/वेतनदार आहे का
👩🏻‍⚕याआईचे नाव/वेतनदार आहे का
शालेय माहिती
📔दाखल खारीज क्रमांक
🏢UDISE No.
जिल्हा
तालुका
शाळेचे नाव
शैक्षणिक वर्ष
वर्ग
चालू वर्गात प्रवेश दिनांक
गेल्या वर्षीचा निकाल

वरील माहिती भरली save & next केला की तुमचा अर्ज भरून झाला. सबमिट केलं की resident/applicant login चे काम संपलं. त्याची एक प्रिंट काढून शाळेत मुख्याध्यापकाकडे आवश्यक  कागदपत्रासोबत जमा करा.
मुख्याध्यापकांनी Institute लॉगिन वापरून application approve केलं की ते अर्ज संबधित विभागाला जातील.यात मुख्याध्यापकाचे काम संपलं.

विभाग Department user लॉगिन वापरून application approve करतील.त्यांनी अर्ज मंजूर केला की शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार लिंक खात्यावर  जमा होणार.याला म्हणतात DBT. महाराष्ट्र राज्याची योजना आहे म्हणून MahaDBT.


   मित्रांनो,  मला वाटते आपणास संपूर्ण माहिती समजली असेलच.
========================================================================

फॉर्म भरण्याकरिता संपर्क करा : 
 कॉल : 9890512233 
मेल : dreamservice2u@gmail.com

No comments:

Post a Comment